चंद्रावर रोव्हर उतरविण्याची ‘नासा’ची मोहीम रद्द

वॉशिंग्टन – चंद्रावर रोव्हर म्हणजेच बग्गी उतरविण्याची ‘व्होलाटाइल्स इन्व्हेस्टिगेटिंग पोलर एक्सप्लोरोशन रोव्हर’ (व्हायपर) मोहीम गुंडाळण्याचा निर्णय अमेरिकेच्या ‘नासा’ने जाहीर केला आहे.खर्चात झालेली वाढ, प्रक्षेपणाला विलंब आणि भविष्यात खर्च आणखी वाढण्याचा धोका असल्याने ही मोहीम रद्द करीत असल्याचे सांगितले आहे.
‘व्हायपर’ मोहिमेसाठी आतापर्यंत ४५ कोटी डॉलर खर्च करण्यात आला आहे. हा खर्च भविष्यात ६० कोटी ६६ लाख डॉलरपर्यंत वाढण्याचा शक्यता आहे.ॲस्ट्रोबोटिक टेक्नॉलॉजी’ कंपनीकडून मिळालेल्या लँडरवरून ‘व्हायपर’ बग्गीचे प्रक्षेपण २०२३ च्या अखेरीस होणार होते. पण लँडरच्या उड्डाणपूर्व चाचण्या घेण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याने हे प्रक्षेपण २०२४ अखेरपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती ‘नासा’ने २०२२ मध्ये केली होती. त्यानंतर वेळोवेळी होणारे बदल आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे ‘व्हायपर’चे प्रक्षेपण सप्टेंबर २०२५पर्यंत लांबले. ‘व्हायपर’ मोहीम सुरू ठेवल्यास खर्च वाढेल आणि त्यामुळे ‘सीएलपीएस’ मोहिमा रद्द होण्याचा किंवा त्यात व्यत्यय येण्याचा धोका असल्याची कल्पना ‘नासा’ने अमेरिकन सरकारला दिली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top