मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होणार किंवा नाही हे जाहीर होण्यापूर्वी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला ऊत आला. एकनाथ शिंदे यांच्याशी मात्र भाजपाच्या भेटीगाठी होत नाहीत .
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. परंतु महायुतीत कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे द्यावीत याचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने या भेटीत अजित पवार गटाला द्यावयाच्या मंत्रिपदांबाबत चर्चा झाली,अशी चर्चा आहे.
बावनकुळे यांनी देवगिरीवर जाण्याआधी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे फडणवीस यांचा निरोप घेऊन ते अजित पवार यांच्याकडे गेले होते का,अशीही चर्चा आहे.