पणजी – उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील सुर्ला गावात असलेल्या प्रसिद्ध धबधब्याजवळ ७.६० कोटी रुपये खर्चुन इको कॅम्प उभारला जाणार आहे. यामध्ये इको हट्स आणि इतर सुविधा असणार आहेत. त्यासाठी ७.६० कोटी रुपये कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.या कामासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने निविदा काढली आहे.
सुर्ला येथील धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.पर्यटकांचा आकडा ज्या प्रमाणात वाढत आहे, त्या प्रमाणात मात्र येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.त्यामुळे पर्यावरणाला पूरक अशा १२ इको हट्स, सॅनिटरी हाऊस आणि खाण्या-पिण्यासाठी रेस्टॉरंट्स आदी सुविधा येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्ष व स्थानिक आमदार डॉ.देविया राणे म्हणाल्या, सुर्ला गाव हा इको टुरिझम डेस्टिनेशन बनवण्याचा माझा उद्देश आहे.पर्यावरणाच्या रक्षणासह पर्यटनाला चालना देणारे विविध प्रकल्प येथे सुरू व्हायला हवेत. इको हट्स उभारण्याची योजना हा त्याचाच एक भाग आहे.