गोव्यातील म्हापसामध्ये कोबी मंचुरियनवर बंदी

पणजी :

भारतातील प्रसिद्ध फास्ट फूड कोबी मंचुरियनवर गोव्यातील म्हापसा येथे बंदी घालण्यात आली आहे. कोबी मंचुरियनवर बंदी घालण्याचे मुख्य कारण स्वच्छता आणि कृत्रिम रंगांचा वापर आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे आहे. कोबीला कृत्रिम रंग वापरून लाल रंग दिला जातो.

२०२२ साली श्री दामोदर मंदिराच्या वास्को सप्तमेळ्यात अन्न व औषध प्रशासनाने मुरगाव महानगरपालिकेला कोबी मंचुरियनची विक्री बंद करण्यास सांगितले होते. स्वच्छतेच्या मुद्द्यावरून गोव्यातील अनेक जत्रांमध्ये लावण्यात आलेल्या स्टॉलवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकले. यानंतर अन्न व औषध प्रशासनने म्हापसा नगरपरिषदेला कोबी मंचुरियन स्टॉल्सवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. त्यावर इतर नगरसेवकांनी सहमती दर्शवली. नगरसेवक तारक आरोलकर यांच्या निर्णयाला विरोधकांनीही पाठिंबा दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top