गोव्यातील कुपवाडा- अडणेत ८ दिवसांपासून पाणीच नाही

पणजी- दक्षिण गोवा जिल्ह्यातील केपे तालुक्यातील कुपवाडा- अडणे गावाचा पाणीपुरवठा गेल्या ८ दिवसांपासुन बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत.पाणीपुरवठा ठप्प झाला असल्याने ग्रामस्थांनी केपे पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी प्रशांत कामत यांची भेट घेऊन त्यांना आपली समस्या कथन केली.
कुपवाडा-अडणे गावामध्ये ६० ते ७० कुटुंबे राहतात. मात्र मागील आठ दिवसांपासून या गावाचा पाणीपुरवठाच अचानकपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू आहेत.महिलांना झरीचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत कामत यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली.यावेळी स्थानिक पंच महेंद्र गावकर हे उपस्थित होते.त्यानंतर कामत यांनी स्वतः गावात येऊन पाहणी करून पाण्याची समस्या दूर करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top