गोव्यातील आगरवाड्यात ४० शेतकर्‍यांची शेती पाण्याखाली

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यातील आगरवाडा पंचायत क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आठवडाभर सुरू असलेल्या या पावसामुळे आगरवाड्यातील ४० शेतकर्‍यांच्या शेतात पाणी भरल्याने पिके कुजून गेली आहेत.

आगरवाडा गावातील ४० शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पारंपारिक आणि आधुनिक यंत्राचा वापर करून शेतात पेरणी केली होती. मात्र यंदा सलग आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतात पाणी भरले असून पिके कुजून गेली आहेत. कृषी विभागाने यावर लक्ष देऊन योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व माजी सरपंच अमोल राऊत यांनी केली आहे.आगरवाडा पंचायत क्षेत्रातील शापोरा नदीकाठी ४० शेतकर्‍यांची ही शेती होती. यंदा शापोरा नदीला पूर आल्यानंतर पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पुराचे पाणी शेतात पंधरा दिवस साचून राहिले.त्यामुळे पिके कुजून गेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top