मुंबई – एकावर एक थर रचून हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांचे कौतुक साऱ्यांना असते. मात्र हाच गोविंदा अपघाताने जायबंदी झाला तर त्याचे पुढचे आयुष्य म्हणजे एक दुस्वप्न ठरते. याच संवेदनशील विषयावर शिक्षक असलेले विलास चव्हाण यांनी थर या चित्रपटाची निर्मिती केली आहे . या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवण्यात आले आहे.
हंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदा पथकातील तरुणाच्या कुटुंबाचे जीवन या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेले आहे. नुकतेच या चित्रपटाची निवड बिहारमधील नवादा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून झाली आहे. याबरोबरच कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथील चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. या चित्रपटाची निर्मिती विलास चव्हाण यांची आहे.