गृहमंत्री अमित शहा १ ऑक्टोबरला मुंबईत

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी भाजपाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १ ऑक्टोबरला मुंबईत येणार असल्याचे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.आशिष शेलार पुढे म्हणाले की, दादर पूर्वच्या स्वामीनायराण मंदिराजवळील योगी हॅालमध्ये १ ऑक्टोबरला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अमित शहा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मुंबईतील ३६ मतदारसंघांबाबत रणनिती आखणार आहे. या बैठकीत भाजपाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top