गुरू ग्रहाच्या चंद्रावर ज्वालामुखीचा उद्रेक

वॉशिंग्टन- सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूच्या चंद्रावर ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आहे. याचा व्हिडिओ अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने सोशल मीडियावर शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे. गुरू ग्रहाच्या या तिसऱ्या चंद्राचे नाव ‘आयओ’ असे आहे. आयओच्या पृष्ठभागावरून लाव्हा बाहेर पडताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आयओ हा आपल्या सौरमालेतील ज्वालामुखी असलेला सर्वात सक्रिय चंद्र मानला जातो. त्याच्या पृष्ठभागावर ४०० हून अधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत,ज्यामध्ये सतत उद्रेक होतात आणि लावा बाहेर पडतो. नासाच्या जूनो मिशनच्या संशोधनामुळे आयओवरील ज्वालामुखीय क्रियांचे ४४ वर्षे जुने रहस्य समजण्यास मदत झाली आहे. आयओवरील ज्वालामुखीच्या उद्रेकाचे पहिले छायाचित्र १९७९ मध्ये घेण्यात आले होते. येथे अनेक तलाव आहेत, ज्यात वितळलेला लाव्हा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top