गुरुवारपासून निवतीमध्ये संत बाळूमामा पादुका दर्शन

सिंधुदुर्ग – वेंगुर्ले तालुक्यातील निवती गावातील साई मंदिरात गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी अदमापुर निवासी संत बाळूमामांच्या पादुकांचे आगमन होत आहे. त्यानिमित्त २ मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पादुका आगमनादिवशी गुरुवारी देव ब्राह्मण पाटकरवाडी येथे भक्तांकढून स्वागत व ढोल-ताशांच्या गजरात पालखी सोहळा निघणार आहे. तसेच साई मंदिर निवती येथे ५१ सुवासिनींच्या हस्ते पादुकांचे स्वागत,आरती व तीर्थप्रसाद आणि १ मार्च रोजी संत बाळूमामांचे नामस्मरण, पादुका पूजन,साई महिता वारकरी मंडळ,निधीचा हरिपाठ,महाभारती, महाप्रसाद,जय गणेश महिला भजन मंडळाचे भजन,देसाई महाराज यांचे बाळूमामा चरित्रावर कीर्तन, हरिओम सांप्रदायिक भजन मंडळ,औदुंबर भजन मंडळाचे भजन, संत बाळूमामा सत्संग मंडळ सरंबळचे भजन आणि २ मार्च रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती आणि सकाळी ९ वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top