मुंबई- गुजरातमध्ये मेयो क्लिनिकच्या सहकार्याने मुंबईतील लीलावती रुग्णालय नवीन रुग्णालय उभारत आहे.लीलावती हॉस्पिटल गिफ्ट सिटी हे मुंबईतील लीलावती रुग्णालयापासून पूर्णपणे वेगळे असणार असल्याची माहिती या रुग्णालयाचे प्रवर्तक चारू मेहता यांनी सांगितले.
या नवीन लीलावती रुग्णालयाचे प्रवर्तक प्रशांत मेहता यांनी सांगितले की, गुजरातमधील हे रुग्णालय ३०० बेड्सचे असून त्यामध्ये अत्याधुनिक उपकरणे,४०० हून अधिक तज्ञ डॉक्टर तसेच सल्लागारांची टीम आणि सुमारे ३ हजार कर्मचारी सेवेत असतील. मेयो क्लिनिक ग्लोबल कन्सल्टींगच्या संयुक्त विद्यमाने ही वैद्यकीय सेवा पुरविली जाणार आहे.