गिर्यारोहक रमा ठाकूर यांची लवकरच एव्हरेस्टवर चढाई

मनाली – हिमाचल प्रदेशमधील सुप्रसिध्द गिर्यारोहक रमा ठाकूर या आता आपल्या पहिल्यावहिल्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत. किलिमंजारो शिखर सर करणाऱ्या रमा या हिमाचल प्रदेशमधील पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत.
हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये जन्मलेल्या रमा ठाकूर यांचे संपूर्ण शिक्षण मनालीमध्येच झाले आहे. २००७ पासून त्यांनी गिर्यारोहण मोहिमांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी नऊ शिखरे पादाक्रांत केली आहेत. त्यांनी मनिला ते लडाख असा सायकल प्रवासही केला आहे.आता त्या जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

रमा यांनी लिंक्डईन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या एव्हरेस्ट मोहिमेची माहिती दिली आहे. एव्हरेस्टवर हवेतील प्राणवायुचे कमी प्रमाण, बर्फाचे उंच उंच कडे, कोणत्याही क्षण बदलणारे हवामान अशा प्रतिकूल वातावरणात हिंमत टिकवून ठेवणे अत्यंत अवघड काम आहे, हे आपल्याला माहीत आहे.म्हणूनच आपण आतापासूनच शारिरीक आणि मानसिक तयारी करीत आहोत,असे रमा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top