पणजी- आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोव्याची हाक देणारे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी यावर्षीच्या गणेश चतुर्थीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नको. तसेच प्लास्टिक फुलांची सजावट,माटोळीचे साहित्य प्लास्टिकचे वापरू नका. पर्यावरणपूरक नैसर्गिक सजावट करा,शाडू मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीची पूजा करा. फराळ व मिठाई देखील घरीच बनवा,असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी समस्त गोमंतकीय जनतेला केले आहे.
गणेश चतुर्थीला चार दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी राज्यातील जनतेला निसर्ग,
पर्यावरण,आपली संस्कृती जपण्याचे आवाहन केले आहे.मुख्यमंत्री म्हणाले की,” लोकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नव्हे,तर शाडू मातीपासून गणेशमूर्तीचे पूजन घरोघरी करावे.तसेच माटोळीला लागणारे साहित्य प्लास्टिकचे न वापरता त्यासाठी डोंगरातील पर्यावरणपूरक खजाना वापरावा किंवा लोकांनी ई- बाजाराच्या माध्यमातुन हे साहित्य ऑनलाईन खरेदी करावे.”