खा. डॉ.अनिल बोंडे यांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतली

मुंबई- राज्यसभेतील भाजपाचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी बोंडे यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. या भेटीचा फोटो डॉ.अनिल बोंडे यांनी फेसबुक वर पोस्ट केला आहे. तर अनिल बोंडे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा सुरु असतानाच ही भेट झाली. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे.