खडवलीच्या भातसा नदी किनाऱ्यावर भीषण आग

ठाणे –

खडवली येथी भातसा नदी किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व ढाब्यांना काल दुपारी अचानक आग लागली. त्यामुळे येथील दुकानदारांची आणि पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. या आगीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये नागरिकांची धावपळ दिसत आहे. आगीमुळे हॉटेल आणि ढाबा मालकांचे मोठे नुकसान झाले.

या परिसरात असलेल्या गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र हॉटेल आणि ढाबा मालकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, खडवली येथील भातसा नदीच्या किनारा पर्यटक स्थळांपैकी एक आहे. आगीच्या घटनेमुळे पर्यटन ठिकाणावर हॉटेल चालक, ढाबे चालक अन्रिशमन उपकरण बाळगत नसल्याचे आढळले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच पर्यटकांच्या जीवालादेखील धोका निर्माण होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top