कोस्टल रोडच्या उद्घाटनाचे ठाकरे गटाच्या नेत्यांना आमंत्रण

मुंबई

मुंबईतील कोस्टल रोडचे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र या सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठाकरे गटाच्या आमदार आणि नेत्यांची नावेदेखील देण्यात आली आहेत. त्यामुळे हे ठाकरे गटाचे नेते या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार का, अशा चर्चा सध्या सुरू आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनिल शिंदे यांची नावे कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेने दिली आहेत. त्यामुळे आता या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोस्टल रोडच्या श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासातील तब्बल अर्ध्या तासाचा वेळ वाचणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कोस्टल रोडचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे कोस्टल रोडचे उद्घाटन करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top