कोल्हापूरचे रिक्षा-टॅक्सीचालक आज रात्रीपासून संपावर

कोल्हापूर: कोल्हापूर येथील १६ हजार रिक्षा आणि टॅक्सीचालक पासिंग दंडाविरोधात २४ जून रोजी रात्रीपासून संपावर जाणार आहेत. रिक्षा, टॅक्सी यांना पासिंग विलंब आकार प्रत्येक दिवशी 50 रुपये आकारला जात आहे. हा दंड त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी २४ जूनला रात्री साडेअकरा ते २५ जून रोजी सायंकाळी पाचपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा आणि टॅक्सी बंद आंदोलन करून संपावर जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीचे नेते विजय देवणे यांनी दिली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 25 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top