कोलकाता – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणीच्या खटल्यातील आरोपी आरजी कर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचा जामीन अर्ज स्थानिक न्यायालयाने आज मंजूर केला. या खटल्यात नियमानुसार ९० दिवसांच्या आत सीबीआयने आरोपपत्र दाखल न केल्यामुळे घोष यांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्यात आली.
१० ऑगस्ट रोजी आर जी कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळली होती.वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेवरून संपूर्ण देशभरात मोठा गदारोळ माजल्यावर संदीप घोष यांना अटक केली होती. कोलकातामधील निवासी डॉक्टरांनी दीर्घ काळ आंदोलन करून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली होती.