कोरोना लस दुष्परिणामाचा दावासुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली – कोरोनाच्या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी अन्य देशांप्रमाणे भारतातही कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या लसीचे दुष्परिणाम असल्याचा दावा करत सर्वोच्चप्रिया मिश्रा यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज ही याचिका सुनावणीस आली असता न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या याचिका केल्या जातात,अशा शब्दात न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले.सक्तीने लसीकरण केले नसते तर त्याचे किती गंभीर परिणाम झाले असते याचाही विचार केला पाहिजे,असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली.