कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, तब्बल 21 हजार पदांची मोठी भरती जाहीर; वाचा सविस्तर

India Post GDS Recruitment 2025: नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. इंडिया पोस्टने देशभरात 21,413 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या रिक्त पदांमध्ये ब्रँच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक यांचा समावेश आहे. 

10वी उत्तीर्ण उमेदवार हे या पदासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक व पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वरून ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च आहे.

India Post GDS Recruitment 2025: महत्त्वाच्या तारखा

अधिकृत वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी 3 मार्चपर्यंत या पदांसाठी करू शकतात. तर अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 6 ते 8 मार्च 2025 आहे.

India Post GDS Recruitment 2025: पात्रता

उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्ष असणे गरजेचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळेल. याशिवाय, मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इंग्रजी आणि गणित विषयांसह इयत्ता 10 वीची माध्यमिक शालेय परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

India Post GDS Recruitment 2025: अर्ज प्रक्रिया व शुल्क

1. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या. 

2.त्यानंतर नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

3. अर्ज करताना तुम्हाला तुमच्या माहितीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरावे लागेल.

4. त्यानंतर माहिती तपासून अर्ज सबमिट करा. 

अर्ज करताना सर्व पदांसाठी 100 रुपये शुल्क लागू आहे. मात्र, सर्व महिला अर्जदार, SC/ST प्रवर्गातील उमेदवार, दिव्यांग उमेदवार आणि ट्रान्सवुमन अर्जदार यांना शुल्क भरावे लागणार नाही. 

India Post GDS Recruitment 2025: निवड प्रक्रिया

या निवड प्रक्रियेसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. निवड थेट 10वीच्या गुणांच्या आधारे होईल. गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार केली जाईल