कोकण रेल्वेचा उद्या अडीच तासांचा मेगाब्लॉक

मडगाव- कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत आडवली ते आचिर्णे विभागादरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.यामुळे कोकण रेल्वेवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.

कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रामुख्याने सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसचा ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड- कणकवली विभागादरम्यान ९० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी स्थानकादरम्यान १० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. तसेच इतर रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top