कोकणात शिमगोत्सवाची धूम गावकऱ्यांची लगबग सुरु

रत्नागिरी :

कोकणात गणेशोत्सवाबरोबरच शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील फणसोप गाव पहिल्या आणि मानाचा शिमगोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालखीत देवाची रूप लावली गेली आहेत. सध्या कोकणात शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. रूप लावल्यानंतर देव गाववेशी बाहेर जाणे इतर गावांमधल्या देवांची भेट घेण्याची प्रथा आहे. कोकणात रात्रीच्या वेळी पारंपारिक वाद्य ढोलावर थाप पडलेली ऐकू येत आहे.

या शिमगोत्सवाला गावकरी तसेच मुंबईत राहणारे चाकरमानी गावात येतात व आपल्या देवाची पालखी अंगावर घेऊन तल्लीन होत असतात. कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. देव देवतांना रूपे लावून शिमगोत्सवाला सुरुवात होते. यावेळी ग्रामस्थ तसेच चाकरमानी देवाला अगदी मनोभावे वस्त्र तसेच दागिने परिधान करतात. अत्यंत दिमाखदार पद्धतीने पालखी सजवली जाते. यावेळी देव देवतांचे आकर्षक रूप पाहून वातावरण भक्तिमय होत असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top