पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यातील केरी गावात श्री आजोबा देवस्थानचा जत्रोत्सव सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने पण धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. यंदाचा हा जत्रोत्सव २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. गोव्यासह महाराष्ट्र,कर्नाटक राज्यातील अनेक भाविक या उत्सवाला उपस्थित राहून आशीर्वाद घेत असतात.
यानिमित्त शुक्रवारी सकाळी अभिषेक,धार्मिक विधी, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व रात्री १२ वाजता नाईक मोचेमाडकर यांचे दशावतारी नाटक आयोजित करण्यात आले आहे. भाविकांनी उपस्थित राहून श्री कृपेस पात्र व्हावे, असे आवाहन श्री आजोबा देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.