केदारनाथ मार्गावर दरड कोसळली महाराष्ट्राच्या २ भाविकांसह तिघांचा मृत्यू

देहरादून- केदारनाथ मंदिराकडे जात असताना चिरबासाजवळील टेकडीवरून अचानक मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा आणि दगड गौरीकुंड- केदारनाथपादचारी मार्गावर कोसळली . ही घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड राज्याची आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी घटनास्थळी पोहचली व जखमींना मदत आणि दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात केली. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे तर आठ भाविक जखमी आहेत. मृतांमध्ये किशोर पराटे (नागपूर,महाराष्ट्र, २१), सुनिल महादेव (जालना,महाराष्ट्र, २४) आणि अनुराग बिष्‍ट (उत्तराखंड, २४) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये महाराष्ट्रातील अभिषेक चौहान (वय १८) आणि धनेश्वर दांडे (वय २७) यांचा समावेश आहे. जखमींवर गरीकुंड रुग्णायालयात उपचार सुरू आहेत.

केदारनाथ यात्रेच्या मार्गावर झालेल्या अपघातावर उत्तराखंडचे सीएम धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिले की, केदारनाथ यात्रा मार्गाजवळील टेकडीवरून ढिगारा आणि मोठमोठे दगड पडल्यामुळे काही यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. बचावकार्य सुरू आहे. जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना केल्या आहेत.

केदारनाथमधील १६ किमी लांबीच्या गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर कायमच दरड कोसळण्याचा धोका असतो. तसेच चिरबासा हे भूस्खलन क्षेत्र आहे. पावसाळ्यात डोंगरावरून दगड पडल्याने तिथे सातत्याने दुर्घटना घडत असतात. गेल्या वर्षीही इथे दरड कोसळल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top