कॅनडात भारतीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

टोरंटो – कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबियातील व्हाईट रॉक परिसरात एका २६ वर्षीय भारतीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. कुलविंदर सिंग सोही असे या तरुणाचे नाव आहे.
ही घटना २३ एप्रिल रोजी घडली. मात्र त्याची माहिती आता उघड झाली आहे.सोही हा प्लंबरचे काम करतो. व्हाईट परिसरातून तो जात असता अज्ञात हल्लेखोराने त्याच्या पोटात चाकू भोसकला व तो पळून गेला.जखमी अवस्थेतही कुलविंदर सिंग याने हल्लेखोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही पावले धावल्यानंतर तो खाली कोसळला. तिथेच त्याचा मृत्यू झाला.
कॅनडामध्ये भारतीयांवर अशा प्रकारचे हल्ले होण्याचे प्रकार अलिकडच्या काळात फार वाढले असून अशा घटनांचा तपास करण्यासाठी कॅनडा पोलिसांनी स्वतंत्र असे इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टमेंट टीम (आयएचआयटी) नावाचे पथक स्थापन केले आहे. या पथकाने कुलविंदरच्या हत्येप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.मात्र त्याचे नाव उघड केलेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top