नवी दिल्ली – केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करावेत. असे काल केलेले विधान खासदार कंगना रनौतने मागे घेतले आहे. या विधानावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला होता.
या बाबत कंगना रनौत ने म्हटले आहे की, तीन कृषी कायद्यांसंदर्भात मी केलेल्या विधानाने जर कोणाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागते व माझे विधान मागे घेते. कंगना रनौतच्या विधानानंतर विरोधी पक्षांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर कंगनाने आपले विधान मागे घेतले. कृषी कायद्याविरोधात या आधीही कंगनाने आंदोलकांवर टीका केली होती. या आंदोलनातील बायका पैसे घेऊन आंदोलन करतात. या तिच्या विधानाचा राग येऊन एका महिला कॉन्स्टेबलने चंदीगढ विमानतळावर तिच्या श्रीमुखात लगावली होती. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन आता कंगनाला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली आहे.