Manikrao Kokate | महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका विधानामुळे सध्या नवीन वादाला तोंड फुटले आहे. माणिकराव कोकाटे यांनी कथितरित्या शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली आहे. ‘अलीकडे भिकारीही एक रुपया घेत नाही; परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला’, असे वक्तव्य कोकाटे यांनी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कथितरित्या शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केल्याने वाद निर्माण झाला. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
‘आजकाल भिकारी देखील एक रुपया घेत नाहीत, पण सरकार शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात पीक विमा देत आहे. त्यामुळे कोणीही सरकारच्या प्रयत्नांबद्दल तक्रार करू नये.’, असे वक्तव्य कोकाटे यांनी केले होते. अखिल भारतीय किसान महासभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी या वक्तव्याचा निषेध यांनी केला.
‘मंत्र्यांनी भिकारी एक रुपयाही स्वीकारत नाहीत, पण शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा मिळतो, असे वक्तव्य केले आहे. आम्ही अशा संकुचित आणि अपमानजनक मानसिकतेचा तीव्र निषेध करतो. हे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना आणि निधी हे मंत्र्यांचे वैयक्तिक देणगी नाहीत, तर ते सार्वजनिक निधीतून दिले जातात’, असे अजित नवले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही कोकोटे यांच्या वक्तव्यावर टीका केली. आता विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.