मुंबई – मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील आरे-बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. या मार्गिकेवरील कुलाबा ते बीकेसीपर्यंतचा दुसरा टप्पा मे २०२५ पर्यंत खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की, महाराष्ट्रात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत.आता मुंबई मेट्रो ३ चे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आपण पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीकरता खुला केला.बीकेसी ते कुलाबापर्यंतचा दुसरा टप्पा आहे.या टप्प्यामुळे मुंबईला खऱ्या अर्थाने लाईफलाईन मिळणार आहे. या मार्गिकेवरुन १७ लाख प्रवासी प्रवास करणार आहेत. मे २०२५ पर्यंत मेट्रो ३ मार्ग खुला करणार आहोत.