देवगड – राज्याच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात समुद्रकिनारी असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सव उद्या शुक्रवार ८ मार्चपासून सुरू होत आहे. या उत्सवात १० मार्च रोजी ६ देव स्वार्या श्री देव कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहेत, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी दिली.
तीन दिवस चालणार्या या महाशिवरात्र उत्सवातील रविवार १० मार्च हा अमावस्या पवित्र स्नानाचा दिवस असून त्याला देव स्वाऱ्यांची सोबत लाभणार आहे. यादिवशी भाविकांचा वाढणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला असून अखंडित विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र स्वयंसेवक तैनात केले जाणार आहेत.