*सपाचे आमदार रईस
शेख यांचा आरोप
मुंबई – काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारालाच मुंबईतील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. आमदार शेख यांनी पालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी यांना पत्र दिले आहे.
आमदार रईस शेख यांनी आपल्या तक्रारीकडे म्हटले आहे की,हिमालय पूल दुर्घटनेनंतर आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. मात्र याच कंपनीला आता मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्ते कामाचे कंत्राट देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. या कंपनीला पश्चिम उपनगरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे १५६६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे.त्यामुळे त्यांनी केलेल्या रस्त्यांच्या निविदा व कामे यांची सध्याची परिस्थिती काय आहे हे उघड झाले पाहिजे.काळ्या यादीतील किती कंत्राटदारांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे दिली आहेत? विलंबाने कामे करणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई केली? निविदेमध्ये घोटाळा केलेल्या पालिका अधिकार्यांवर काय कारवाई केली?अशी विचारणा आमदार शेख यांनी आपल्या पत्रातून आयुक्तांकडे केली आहे.