कार्तिकच्या ‘आशिकी 3’ सिनेमाचा शानदार टीझर आला समोर, चित्रपटात झळकणार ‘ही’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री

Aashiqui 3 Movie: अभिनेता कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षित आशिकी 3 (Aashiqui 3) या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. मेकर्सनी या चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वात वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिकच्या या नवीन चित्रपटाची चर्चा सुरू आहे. मात्र, चिपटाच्या नावावरून वाद सुरू होता. आता चित्रपटाचा एक टीझर समोर आला आहे.

दीर्घकाळापासून अशी चर्चा होती की कार्तिक आर्यन ‘आशिकी 3’ चा भाग असणार आहे. मात्र, चित्रपटाच्या शीर्षकावरून काही अडचणी येत होत्या. आता कार्तिक आर्यनने एक टीझर (पहिली झलक) जारी केला आहे.  टीझर पाहून तुम्हाला ‘आशिकी 2’ ची आठवण येईल.

टीझर समोर आला असला तरीही अद्याप चित्रपटाच्या नावावरून पडदा उठवलेला नाही. टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे की हा ‘आशिकी 3’ चाच टीझर आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री श्रीलीला दिसणार आहे.  या चित्रपटाच्या माध्यमातून श्रीलीला हिंदी चित्रपटात डेब्यू करणार आहे.

या टीझरच्या सुरुवातीला कार्तिक आर्यन दु:खी प्रियकराप्रमाणे दिसत होते. प्रेक्षकांनी भरलेल्या कॉन्सर्टमध्ये हातात गिटार घेत कार्तिक आर्यन गाणे गाताना दिसतो.  एका दृश्यात त्याच्या तोंडात सिगारेट आहे आणि हातात गिटार. तो गाणं गात आपल्या प्रेमाच्या आठवणींत हरवलेला दिसतो. त्याची दाढीही वाढलेली आहे.

कार्तिक-श्रीलीलाचा हा चित्रपट यावर्षी दिवाळीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू हे करणार आहेत.