कामाठीपुरा भागात इमारतीला आग

मुंबई

मुंबईतील ग्रँट रोडच्या कामाठीपुरा भागातील लेन क्रमांक ३ येथील एका जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज दुपारच्या सुमारास आग लागली. काही क्षणातच ही आग इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अधिकाऱ्यांनी इमारतीतील सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top