पुणे – पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज भागात मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला, तर पती-पत्नी जखमी झाले. या अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीपाली वैभव बर्गे असे मृत महिलेचे नाव आहे. पार्वती आदिनाथ वायदंडे आणि त्यांचे पती जखमी झाले.पार्वती यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दीपाली, त्यांची मैत्रीण पार्वती, पती आदिनाथ रात्री आठ वाजता कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी कात्रज घाटातून पुण्याकडे निघालेल्या भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दीपाली, पार्वती आणि त्यांचे पती आदिनाथ यांना धडक देऊन टेम्पोचालक पसार झाला. नागरिकांनी दीपाली, पार्वती आणि त्यांचे पती आदिनाथ यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दीपाली यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |