काजरघाटीत २२ मार्चपासून महालक्ष्मी शिमगोत्सव सुरू होणार

रत्नागिरी- तालुक्यातील काजरघाटी गावातील महालक्ष्मीचा शिमगोत्सव शुक्रवार २२ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा देवीची होळी झाडगावातील राजा मयेकर यांच्या बागेतून घेण्यात येणार असून बुधवारी २० मार्च रोजी महालक्ष्मीला रूपे लागणार आहे.

यावर्षीची होळी रत्नागिरी येथील राजा मयेकर यांच्या बागेत असून २१ मार्चला ही होळी घेऊन पालखी वाजतगाजत काजरघाटीत जाणार आहे. दुसऱ्या दिवशी २२ मार्चला सायंकाळी चार वाजता श्री महालक्ष्मी देवीची होळी उभी केली जाईल. २२ ते २६ मार्चला दुपारपर्यंत पालखी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये स्थानापन्न राहील. २६ मार्चला दुपारी बारा वाजता पालखी श्री देव रामेश्वराला शिंपणे घालणे व रामेश्वर वाडीतील पूजा घेण्यासाठी बाहेर पडेल. २७ मार्च ते १ एप्रिलपर्यंत पालखी काजरघाटी येथील पूजा घेणार आहे. २ एप्रिलला काजरघाटीतील उर्वरित पूजा घेऊन पालखी कुवारबाव येथील पूजा घेण्यासाठी रवाना होणार आहे.३ ते ६ एप्रिलपर्यंत पालखीकुवारबाव येथील पूजा घेणार आहे. ७ एप्रिलला कुवारबाव व साईनगर येथील उर्वरित पूजा घेतल्या जातील. त्यानंतर पालखी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये येणार आहे. तिथे रूपे उतरवून झाल्यावर शिमगोत्सवाची सांगता होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top