करण वाही, क्रिस्टल डिसुझाची मुंबईमध्ये ईडीकडून चौकशी

मुंबई- टीव्ही कलाकार करण वाही आणि क्रिस्टल डिसुझा अडचणीत सापडले आहेत. दोन्ही कलाकारांची मनी लाँड्रिंगप्रकरणी मुंबईत ईडीने चौकशी केली. ट्रेडिंग ऑक्टाफक्स ॲपद्वारे ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये सामील झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

ऑनलाइन ट्रेडिंग ॲपच्या जाहिरातीप्रकरणी ईडीने टीव्ही अभिनेत्री निया शर्मालाही समन्स बजावले असून तिला लवकरच ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकर ओक्टोफक्स ट्रेडिंग ॲपद्वारे भारतात अवैध ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग झाले. आरबीआयकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. पुणे पोलिसांनी याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर याप्रकरणाची ईडीने चौकशी सुरू केली. याच प्रकरणात ईडीने एप्रिल २०२४ मध्ये मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली येथे छापे टाकले होते. या काळात ईडीने अनेक डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे जप्त केली . अंदाजे अडीच कोटी रुपयांचा बँक निधीही गोठवण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top