नवी मुंबई – हार्बर रेल्वे मार्गावर आज दुपारी ३:३० च्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल स्थानकाबाहेर काम सुरु असताना जेसीबीमुळे ओव्हरहेड वायर तुटली होती.त्यामुळे सीएसएमटीकडून पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांचा काही काळ खोळंबा झाला. काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून चालत प्रवास केला. तासाभराने हार्बर मार्गावर वाहतूक सुरळीत झाली.
