ओलाचा धमाका! एकाच वेळी लाँच केल्या 4 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा किंमत

Ola New Scooter: देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने पोर्टफोलिओचा विस्तार करत तिसऱ्या पिढीचे इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहेत. कंपनीने एकूण चार व्हेरिएंट्स सादर केले असून, याची सुरुवाती किंमत 79,999 रुपये आहे. यासोबतच, नवीन फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro Plus देखील लाँच केले आहे. या नवीन जनरेशन स्कूटरविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

ओलाच्या थर्ड जनरेशन स्कूटरमध्ये काय खास आहे?

कंपनीनुसार, थर्ड जनरेशन स्कूटरला पूर्णपणे नव्या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले आहे. यात संपूर्ण नवीन पॉवरट्रेनचा वापर करण्यात आला आहे. स्कूटरमध्ये हबलेस मोटरऐवजी नवीन मिड-ड्राईव्ह इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. याशिवाय, पेटेंटेड ब्रेक बाय वायर टेक्नोलॉजीचाही वापर करण्यात आला आहे.

OLA S1 X

ओलाचे थर्ड जनरेशन बेस मॉडेल S1 X मध्ये 2kW, 3kW आणि 4kW असे एकूण तीन बॅटरी पॅक पर्याय मिळतात. यांची किंमत अनुक्रमे 79,999 रुपये, 89,999 रुपये आणि 99,999 रुपये आहे. या स्कूटरमध्ये 7kW पीक पॉवर जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. स्कूटरचा त्याची टॉप स्पीड ताशी 123 किमी एवढा आहे. याच्या सर्वात मोठ्या 4kW बॅटरी पॅकची ड्रायव्हिंग रेंज सिंगल चार्जमध्ये 242 किलोमीटर पर्यंत आहे.

OLA S1 X+

OLA S1 X+मॉडेल फक्त 4kWh बॅटरी पॅकसह येते. या स्कूटरमध्ये 11kW पीक पॉवर जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. कं या स्कूटरची किंमत 1,07,999 रुपये असून, टॉप स्पीड 125 किमी/तास आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 242 किलोमीटर पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देईल.

OLA S1 Pro

OLA S1 Pro स्कूटर अनुक्रमे 1,14,999 आणि 1,34,999 रुपये किंमतीत येते. ही किंमत 3kWh आणि 4kWh बॅटरी पॅकसह येणाऱ्या व्हेरिएंटची आहे. कंपनीचा दावा आहे की, हा स्कूटर सिंगल चार्जमध्ये 242 किमी ड्रायव्हिंग रेंज देईल.

OLA S1 Pro +

ओलाच्या थर्ड जनरेशनमध्ये सर्वात महागडे आणि फ्लॅगशिप मॉडेल आता OLA S1 Pro + हे आहे.  कंपनीने या स्कूटरला 4kWh आणि 5kWh बॅटरी पॅकसह सादर केले असून, याची किंमत अनुक्रमे 1,54,999 रुपये आणि 1,69,999 रुपये आहे. या स्कूटरमध्ये ड्युअल-चॅनेल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सह अनेक अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 320 किलोमीटर पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज प्रदान करेल.