एसटी महामंडळाच्या सेवेत आता नव्या बसेसचा ताफा

मुंबई – एसटी महामंडळाच्या सेवेत आता लवकरच २ हजार ५०० नवीन बसचा ताफा दाखल होणार आहे. यातील पहिल्या टप्यात ५० ते १०० नवीन डिझेल बस चालू सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत महामंडळाच्या
ताब्यात येतील.

अशोक लेलैंड ही आघाडीची कंपनी एसटी महामंडळाला या नवीन बसेसचा पुरवठा करणार आहे.एसटीच्या आवश्यकतेनुसार मॉडेल बनवून तयार झाले असून त्याच्या विविध स्तरांवर चाचण्या घेण्याचे काम सुरू होते.काल मंगळवारी कंपनीच्या तामिळनातील तिरुचिरापल्ली येथील कारखान्यात या मॉडेलचे अंतिम सर्वेक्षण करण्यात आले.२,५०० बसेसची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पुढील ८ ते ९ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता कंपनीने वर्तविली आहे.पहिल्या १०० बसचा ताफा मंडळाकडे दिल्यानंतर पुढील टप्यात १५० ते ३०० बसेस नोव्हेंबर महिन्यात मंडळाला देण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top