एसटीच्या ताफ्यात येणार २४७५ नव्या कोऱ्या बसेस

मुंबई- एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या गडद लाल रंगाच्या २४७५ नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दाखल होणार आहेत.

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नव्या बससाठी एकहजार बारा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यावेळी एसटी महामंडळाने अशोक लेलँड कंपनीसोबत नव्या बससाठी करार केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरच्या शेवटी ३०० नव्या बसचा ताफा एसटी महामंडळात दाखल होईल. एका बसची किंमत ३८ लाख २६ हजार रुपये असून अशोक लेलँडन कंपनीने या बसेसची बांधणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, नव्या एसटी बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत याचा आनंदच आहे. एक वर्षापूर्वी याचे टेंडर पास झाले होते. स्वमालकीच्या गाड्या येत आहेत याचा जास्त आनंद आहे. मात्र,या गाड्या एसटीच्या वर्कशॉपमध्ये बांधल्या असत्या तर वर्कशॉपला हे काम मिळाले असते आणि पैसेही वाचले असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top