एसटीची ट्रकला धडक! एकाचा मृत्यू! १५ जखमी

बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातग्रस्त बस पुण्यावरून शेगावला जात होती. या बसमधून २० ते २२ प्रवासी प्रवास करीत होते. आज पहाटे ही बस चिखली-देऊळगावराजा मार्गावरील रामनगर फाट्याजवळ आली असता, चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात मालवाहू ट्रक आला. मालवाहू ट्रकने बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेला प्रवासी खामगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलीस घटनास्थळी पोहचले. बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top