मुंबई – उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबई ते मडगाव विशेष साप्ताहिक रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोकणातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मडगाव जंक्शन येथून मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत दर रविवारी सायंकाळी ४१:३० वाजता सुटेल. तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७ एप्रिल ते ५ मेपर्यंत दर सोमवारी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी मडगाव येथे रात्री ९.४० वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी आदी स्थानकांवर ही रेल्वे थांबेल.
