उद्धव ठाकरेंनी तुळजा भवानीचे दर्शन घेतले

धाराशिव – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आई तुळजाभवानीचे सपत्नीक दर्शन घेतले.उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने फोडला होता. तर, काल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आई तुळजाभवानीला सगळी भ्रष्ट आणि दहशतीची राजवट लवकर हटव असे साकडे घातले आहे, असे सांगितले.