उत्तराखंडाच्या भाजपा सरकारकडून११ ठिकाणांच्या नावात बदल केला

हरिद्वार – उत्तराखंडमधील भाजपाच्या पुष्कर धामी सरकारने हरिद्वार, देहरादून , नैनिताल , उधमसिंह नगर या जिल्ह्यातील ११ ठिकाणांची नावे बदलली. लोकभावना आणि भारतीय संस्कृती लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले.
मोहम्मदपूर जटचे नाव मोहनपूर जट , खानापूर कुर्सलीचे आंबेडकर नगर , औरंगजेबपूरचे शिवाजी नगर , पीरवाला चे केसरी नगर , नवाबी रोडचा अटल मार्ग असे ११ ठिकाणचे नाव बदल झाले . यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष असलेल्या काॅंग्रेसचे नेते हरिष रावत म्हणाले की नाव बदलण्याला आमचा विरोध नाही आणि पाठिंबाही नाही . भाजपा सरकार गेले काही वर्षे निष्प्रभ ठरले आहे . त्यांच्या अकार्यक्षमतेवरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी हे नाव बदल सुरू केले आहेत .