उत्तरकाशीतील वरुणावत पर्वतावरुनदगडांचा वर्षाव! नागरिक भयभीत

उत्तरकाशी – उत्तरकाशीच्या वरुणावत पर्वतावरुन झालेल्या दगडांच्या वर्षांवामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गोफियारा क्षेत्रात एकच गोंधळ झाला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी या पर्वतावर जाऊन दगड पडण्याच्या कारणांची पाहणी केली.वरुणावत पर्वतावरुन काल रात्रीपासून अचानक दगडगोटे पडू लागले. ते अनेक वस्यांवर पडले. त्याने घाबरून जाऊन लोकांनी आपली घरे दारे सोडून मोकळ्या जागेत आश्रय घेतला. जोरदार पाऊस, पूरस्थिती त्याचबरोबर डोंगरातून पडणाऱ्या या दगडांमुळे नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. नेमके कशामुळे वेगवेगळ्या आकाराचे हे दगड कोसळत आहेत याचा शोध घेण्यासाठी अखेर आपत्ती दलाला पाचारण करण्यात आले. पर्वतावर कोसळत असलेल्या पावसामुळे मातीतील हे दगड सुटे होऊन कोसळत असावेत, असा अंदाज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top