ईव्हीएम विरोधात वंचितचे आजपासून जनआंदोलन

मुंबई- वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ३ डिसेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.