अमरावती – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले तिसऱ्या आघाडीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे की निवडणुका मतपत्रिकेवर व्हायला पाहिजेत. ईव्हीएमवर नको.
ईव्हीएमच्या निकालांवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर यापुढील सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवरच घेतल्या जाव्या. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे अशी भूमिकाही कडू यांनी मांडली. शिंदेंनी शिवसेनेत बंड केले नसते तर आज वेगळे चित्र दिसले असते. शिंदेंच्या बंडामुळेच भाजपा सत्तेवर आली. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपद दिले जावे,असे कडू यांनी म्हटले.