मुंबई – येत्या सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लीम धर्मियांच्या ईद ए मिलाद निमित्त राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी यंदा १६ सप्टेंबर ऐवजी बुधवार १८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. काल हा निर्णय झाला .
मंगळवार १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदुंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या उद्देशाने यंदा ईद ए मिलादचा जुलूस १६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारला शासकीय सुट्टी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली. मुस्लीम संघटनांच्या या विनंतीला मान देत शासनाने अधिकृत निर्णयाने ईद ए मिलादची सुट्टी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर क्षेत्रामध्ये १८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे.