इस्रायलविरोधी धोरणामुळे आर्यलंडमधील दूतावास बंद

तेल अवीव- इस्रायल विरोधी धोरणामुळे आयर्लंडमधील दूतावास बंद करण्याची घोषणा इस्रायलने केली आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडॉन सार यांनी आयर्लंडवर दुटप्पीपणाचा आरोप केला. आयर्लंडने पॅलेस्टाईनला वेगळे राज्य म्हणून मान्यता दिल्यामुळे इस्रायलने हा निर्णय घेतला आहे.
आर्यंलंडने दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) दाखल केलेल्या नरसंहाराच्या खटल्यालाही पाठिंबा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर गाझा युद्धात पॅलेस्टिनींचा नरसंहार केल्याचा आरोप करत यावर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा दाखल केला होता. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री सार यांनी आयर्लंडवर सेमेटिझमच्या वाढत्या प्रकरणांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे इस्रायलने मे महिन्यातच आयर्लंडमधून आपले राजदूत परत बोलावले होते. आयरिश पंतप्रधान सायमन हॅरिस यांनी इस्रायलच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. दूतावास बंद करण्याच्या निर्णयाला त्यांनी खेदजनक असून आयर्लंड शांतता, मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायद्यासाठी उभा असे म्हटले आहे.
हॅरिसने इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन स्वतंत्र राज्यांच्या स्थापनेचे समर्थन केले. दुसरीकडे आयर्लंडचे परराष्ट्र मंत्री मायकल मार्टिन यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कायम राहतील. आयर्लंड इस्रायलमधील आपला दूतावास बंद करणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top