इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याला मुदतवाढ नाही

नवी दिल्ली
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फायलिंगला मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे आयकर (प्राप्तिकर) विभागाने स्पष्ट केले. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख दरवर्षी ३१ जुलै ही असते. अपवादात्मक परिस्थितीत ही तारीख वाढवली जाते. यंदा अनेक करदात्यांना ई-फायलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तशा तक्रारीही केल्या जात आहेत. मात्र, तरीही इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगची तारीख वाढवली जाणार नसल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलैपर्यंत जवळपास ५ कोटी लोकांनी आयटीआर दाखल केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआर फायलिंगचा वेग चांगला आहे.
३१ जुलै ही वैयक्तिक रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत आयटीआर न भरल्यास दंडासह ३१ डिसेंबरपर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top