इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या आयपीओला प्रचंड प्रतिसाद, जाणून घ्या अलॉटमेंट स्टेटस पाहण्याची पूर्ण प्रक्रिया

Indo Farm Equipment IPO Allotment Status: इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा आयपीओ काही दिवसांपूर्वी गुंतवणुकदारांसाठी खुला झाला होता. आयपीओसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया समाप्त झाली असून, गुंतवणुकदारांना याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

गुंतवणुकदारांकडून इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या (Indo Farm Equipment IPO Allotment) अलॉटमेंटची वाट पाहिली जात आहे. गुंतवणूकदार आता BSE आणि NSE च्या वेबसाइटवर, तसेच रजिस्ट्रार मास सर्व्हिसेस लिमिटेडच्या पोर्टलवर IPO अलॉटमेंटची स्थिती तपासू शकतात.

कंपनीचा आयपीओ 31 डिसेंबरला उघडला होता. तर 2 जानेवारी 2025 पर्यंत बोली लावता येणार होती. या कालावधीत तब्ल 227.67 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून 101.79 पट सबस्क्रिप्शन,  एनआयआयंनी (non-institutional investors) 501.75 पट आणि क्यूआयबी (qualified institutional buyer)  कॅटेगरीमध्ये 242.4 पट अधिक सबस्क्रिप्शन प्राप्त झाले आहे.

या आयपीओच्या शेअर्सची किंमत 204 ते 215 रुपये निर्धारित करण्यात आली होती. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा (Indo Farm Equipment IPO Allotment) आयपीओ 7 जानेवारी 2025 ला शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. तसेच, आयपीओचे वाटप अंतिम झाले असून, गुंतवणूकदारांना यासंदर्भात मेसेज प्राप्त झाले आहेत.

इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओचे अलॉटमेंट स्टेटस (Indo Farm Equipment IPO Allotment Status) कसे तपासू शकता?

यासाठी तुम्हाला https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx. या बीएसईच्या साइटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर ‘Issue Type’ पर्यायावर क्लिक करून ‘Equity’ निवडा.

आता ‘Issue Name’ वर जाऊन ‘Indo Farm Equipment Ltd’ पर्याय निवडा.

त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक अथवा पॅन नंबर टाका.

पुढे ‘I am not a robot’ वर क्लिक करून सर्च करा.

ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओचे अलॉटमेंट स्टेटस (Indo Farm Equipment IPO Allotment Status) दिसेल. तुम्ही रजिस्ट्रार मास सर्व्हिसेस लिमिटेडचे पोर्टल https://www.masserv.com/opt.asp वर जाऊन देखील अलॉटमेंट स्टेटस पाहू शकता.